संतापजनक ! महिला दिनीच युवतीवर बलात्कार करून हत्या केल्याचं उघड, नराधमास अटक

अकोले : पोलीसनामा ऑनलाईन – महिला दिनी खानापूर परिसरात दत्ता भिमा पडसे या आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून उद्या बुधवारी पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आरोपी हा मुलीच्या परिसरात राहत असल्याने त्याला पीडीतेचा दिनक्रम माहित होता. ती स्वभावाने शांत असल्यामुळे तो नेहमी तिच्याशी लगट करीत असे. त्या दिवशी ती रानात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता, दुपारी तिला एकटे पाहून नराधमाने तिच्या एकटेपणाचा व शांत स्वभावाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तीने आरडाओरड करु नये म्हणून तिच्या तोंडात टॉवेल कोंबला. या दरम्यान पीडित मुलगी वेदनांनी बेशुद्ध झाली असता तिचा गुदमरून मृत्यू झाला.

हि घटना लवकर कोणाला समजली नाही, परिसरातील नागरिकांना हे प्रेत अनोळखी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. काही काळानंतर पीडितेची ओळख पटली त्यानंतर खानापूर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी स्वत: लक्ष घालत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पथकांना पाचारण केेले. त्यांच्या टिमने दोन दिवस या परिसरात साध्या वेशात स्थानिक तरुणांच्या मदतीने तपासाला गती दिली. दोन दिवसानंतर संशयतींना ताब्यात घेण्यात आले.

दत्ता भीमा पडसे विरोधात पुरावे मिळाले असून त्याच्या शरीरावर काही व्रण आहेत. त्यामुळे पोलिसानी त्याला ताब्यात घेऊन घटनेची उकल केली. पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत.