क्रुरपणाचा कळस !पतीने पत्नीचे ‘नाक’ कापले, मान, हाता-पायावर कुर्‍हाडीचे ‘घाव’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख ) – दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथे किरकोळ वादातून पतीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

तानाजी वाघमारे रा. चौफुला असे या पतीचे नाव असून यवत पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तानाजी वाघमारे याने आपली पत्नी रेखा वाघमारे हिच्यावर किरकोळ वादातून चिडून जाऊन सांगितलेले ऐकू वाटत नाही का असे म्हणत अगोदर उजव्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातला.

त्यानंतर रेखा ही खाली कोसळताच तिच्या पोटावर पाय ठेऊन मानेवर कुऱ्हाडीचा घाव घालत घरातून कात्री आणून तिचे नाक कापले. यानंतर त्याने तिच्या दोन्ही हातांवर पुन्हा घाव घालून तेथून निघून गेला. पतीने केलेल्या निर्दयी हल्ल्यानंतर रेखा हिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. अधिक तपास पो.ह.बंडगर करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

‘बीडीओं’ ना असणार बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार, संभ्रम दूर

ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान ; यकृत पुण्यात तर दोन्ही मूत्रपिंड मुंबईत

तंबाखूमुक्ती साठी शैक्षणिक संस्थांमध्ये निरीक्षक नेमण्याचे निर्देश

उष्माघाताने पंधरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू