डॉक्टर महिलेनं मॅट्रिमोनियल साइटवर तरुणाला पाठवले खासगी फोटो अन् नंतर..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं मॅट्रोमोनिअल साइटद्वारे महिलांशी मैत्री व त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक केली आहे. कबीर सिंग हा बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर इव्हेंट कंपनी चालवणारा आरोपी ब्लॅकमेलर बनल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरात अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. मात्र, यात सिनेमाक्षेत्रात काम करण्यासाठी येणाऱ्या महिलांवर अत्याच्यार झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मॉडेल होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या एका स्मार्ट तरूणीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड कले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मॅट्रोमोनिअल साईटवर बनावट खातं तयार केलं. त्यानंतर मुलींना लग्नाची खात्री पटवून देत त्यांना ब्लॅकमेल करून महिलांचे खासगी फोटो मिळवले. आरोपी हाय-प्रोफाइनल महिला आणि मुलींना आपले लक्ष करायचा.

एका महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. स्वत: हाडांचा डॉक्टर असल्याचे सांगून आरोपीने डेटिंग अ‍ॅपवर आपलं प्रोफाइल बनवलं. सायबर सेलनुसार आरोपीने आतापर्यंत अनेक मुली आणि महिलांना ब्लॅकमेल केलं आहे. अटक केलेल्या आरोपीमध्ये गाझियाबाद येथील रहिवासी आनंद कुमार आणि त्याचा मित्र प्रियांम यादव यांचा समावेश आहे.

सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. आनेश राय यांनी सांगितले की, एका महिला डॉक्टरने डॉ. रोहित गुजराल नावाच्या व्यक्तीशी डेटिंग अॅपद्वारे मैत्री केल्याची तक्रार दिली. त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन देऊन जवळीक वाढवली. आरोपीने सोशल मीडियावरून काही खासगी फोटो आणि व्हिडिओ शोधले. नंतर ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे फोटो शेअर करण्याची धमकी देत तीस हजार रुपये घेतले.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपीला लाजपत नगर मेट्रो स्टेशनजवळ पाळत ठेवून अटक केली. त्यानंतर त्याचा साथीदाराला त्याच जागेवर पडकण्यात आले. यापूर्वी देखील अनेक महिलांनी आरोपीविरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार आता पोलीस पुढील तपास करत आहेत.