विवाहविषयक ‘वेब साईट’वर जुळलं ! लग्नापूर्वी एकदा भेटूच म्हणत त्यानं महिला अधिकाऱ्यावर केला ‘बलात्कार’

हरियाणा : वृत्तसंस्था – शादी डॉट कॉमवरून एका तरुणीला लग्नाच आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणामध्ये पीडित महिला बीपीओ (BPO) मध्ये एका उच्च पदावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी गौरव मिश्रा याचा शोध घेत आहेत.

गौरव मिश्रा आणि पीडितेची ओळख Shadi.com या वेबसाइटवरून झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणं सुरु झाले. आपण लग्न करू असे आरोपी गौरवने पीडितेला सांगितले. ते भेटल्यानंतर आरोपी गौरवने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी फरार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत आरोपी गौरव मिश्रा विरुद्ध लेखी तक्रार केली आहे.

पीडीतेने दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी गौरव मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलताना सावधान रहा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तर सोशल नेटवर्किंग साइटवर कोणाशीही बोलताना आपली वैयक्तीक माहिती सांगू नका आणि बोलताना सावधानता बाळगावी असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like