‘कोरोना’ व्हायरसची अशीही भिती, संसर्गापासून वाचण्यासाठी पती-पत्नीने बुक केले संपूर्ण फ्लाइट

जकार्ता : कोरोना व्हायरसने (coronavirus) संपूर्ण जगात प्रकोप माजवला आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांना एकमेकांपासून योग्य अंतर राखण्याचा सल्ला दिला जात आहे. याच कारणामुळे मागील एक वर्षापासून लोक प्रवास करणे देखील टाळू लागले आहेत. परंतु, इंडोनेशियामध्ये एका व्यक्तीने फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी जे केले ते जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल की, लोकांच्या मनात कोरोना (coronavirus) भिती कशाप्रकारे ठाण मांडून बसली आहे.

इंडोनेशियाच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह सुरक्षित प्रवास करण्यासाठी कोरोनाच्या भितीने संपूर्ण पॅसेंजर फ्लाइटच बुक केले. जकार्ताची ही व्यक्ती रिचर्ड मुल्जादीने एका विमानाचे छायाचित्र पोस्ट केले, ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नीच दिसत आहेत.

लोक कोरोना व्हायरसच्या भितीने सार्वजनिक वाहतुकीपासून दूर राहात आहेत. सर्व उपाय करत असूनही लोक एकमेकांकडे संशयाने पाहताना दिसत आहेत.

याच भितीपोटी रिचर्ड मुल्जादी यांनी ही पद्धत अवलंबली. रिचर्ड आपल्या भव्य जीवन शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी जकार्ता ते बालीसाठी आपल्या पत्नीसोबत उड्डाण घेतले. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी इंस्टाग्रामवर अनेक छायाचित्र शेयर केली, ज्यामध्ये संपूर्ण विमानात केवळ ते आणि त्यांची पत्नीच बसलेले दिसत आहेत, आणि इतर सीट रिकाम्या दिसत आहेत.

मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले नाही की, या वैयक्तिक उड्डाणासाठी त्यांनी किती पैसे मोचले. त्यांनी एवढेच सांगितले की, चार्टर प्लेनच्या तुलनेत पॅसेंजर विमानाची बुकिंग स्वस्त होती. रिचर्ड यांनी म्हटले की, ते आणि त्यांची पत्नी शाल्विन चांग व्हायरसमुळे खुप घाबरलेले होते. बाटिक एयरचे संचालन करणारी कंपनी लॉयन एयरलाईन्सने कथित प्रकारे यास दुजोरा दिला की, उड्डाणात एकमात्र प्रवासी रिचर्ड आणि त्यांची पत्नी होते. रिचर्ड इंडोनेशियाचे मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जातात.