कौतुकास्पद ! 2 व्यक्तींच्या जीवासाठी ‘रोजा’ सोडून निभावला माणूसकीचा धर्म

उदयपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. बेड उपलब्ध नाहीत तर स्मशानभूमीतही नंबरची वाट पहावी लागत आहे. या परिस्थितीमुळे लोक हैराण झाले. या स्थितीतही काही लोक माणुसकीचा धर्म जपत आहेत. त्यापैकीच एक आहेत अकील अहमद. दोन महिलांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी रोजा सोडून प्लाझ्मा दान करत माणुसकीचा धर्म निभावला आहे. त्यांच्या या कृतीने सर्वांचीच मने जिंकली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, उदयपूर येथे असणाऱ्या पॅसिफिक हॉस्पिटमध्ये छोटी सादडी गावातील ३६ वर्षीय निर्मला चार दिवसांपासून तर ऋषभदेव येथे राहणारी ३० वर्षीय अलका दोन दिवसांपासून भरती आहे. दोघान्चीही तब्येत गंभीर आहे. विशेष म्हणजे दोघींचाही ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह होता. त्यांना प्लाझ्माची गरज होती. डॉक्टरांनी रुग्णालयात त्या गटाचा प्लाझ्मा नसल्यचे सांगितले. नातेवाईकांनी केलेले प्रयत्न अपुरे पडू लागले. दरम्यान रक्त युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना ए पॉझिटिव्ह प्लाझ्मा हवा असलायची माहिती मिळाली. त्यांनीही प्रयत्न सुरु केले.

त्यावेळी या कार्यकर्त्यांना अकील मंसूरी यांची आठवण आली. कारण त्यांनी याआधी १७ वेळा रक्तादान केलं होतं. त्यांचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह असल्याचे माहीत होते. कार्यकर्ता अर्पित कोठारी यांनी वेळ वाया न घालवता अकील यांना प्लाझ्मा देण्याची विनंती केली. मात्र, अकील यांनी रोजा ठेवला होता. मात्र अकील हे प्लाझ्मा डोनेट करायला पोहोचले. पण रिकाम्या पोटी प्लाझ्मा घेऊ शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अकील यांची द्विधा मनस्थिती झाली होती.

काय करायचे हा मोठा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न उपस्थित झाला अखेर त्यांनी माणुसकीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी रोजा सॊडत अल्लाहचे आभार मानले. त्यानंतर नाश्ता केला. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा प्लाझ्मा घेतला. हा प्लाझ्मा दोन्ही महिलांना देण्यात आला. अकील यांनी तिसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केला आहे. या दोन्ही महिला लवकर ठीक व्हाव्यात अशी अल्लाहकडे प्रार्थना करतो असे अकील म्हणाले.