काय सांगता ! होय, कॉल गर्लला पैसे देण्यासाठी शिक्षकानं चक्क केली शेजार्‍याच्या घरात चोरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   चोरीच्या उद्देश्याने घरात शिरलेला एक तरुण शिक्षक पकडला गेला. त्याची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, कॉल गर्लचे पैसे द्यायचे होते, पण माझ्याकडे पैसे नसल्याने मी चोरीचा मार्ग अवलंबला. या प्रकरणी कोर्टाने त्याला 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ब्रिटनमध्ये हा प्रकार घडला आहे.

एडम मॉरिसन (वय 27) असे या शिक्षकाचे नाव असून तो सायन्स हा विषय शिकवतो. एडम हा दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होता. तसेच तो कॉल गर्ललाही घरी बोलावत असे. कॉलगर्लसोबत संबंध ठेवल्यावर ती त्याच्याकडे पैशाची मागणी करू लागली. मात्र त्यावेळी एडमकडे पैसे नव्हते.

त्यामुळे एडमने रात्री 11 वाजता तोंडावर मास्क बांधून चोरी करण्यासाठी शेजा-याच्या घरात शिरला. त्याच्या हातात एक धारदार वस्तूही होती. यावेळी घरात राहणा-या सॅम आणि ग्रेसने त्याला पाहिले. यावेळी सॅम आणि एडममध्ये धक्काबुक्की झाली. यात सॅम जखमी झाला. त्यानंतर सॅमने एडमवर नियंत्रण मिळवून त्याला पकडले. त्यावेळी एडमच्या खिशात त्याला ग्रेसच अंतर्वस्त्रही सापडले. याबाबत तो म्हणाला की, त्याला काही आठवत नाही. तर ग्रेसला या घटनेनंतर धक्का बसला आहे. याप्रकरणी एडमच्या वकिलांनी त्याला डिफेंड करताना सांगितले की, एडम एक शिक्षक आहे. त्याची आई एक सोशल वर्कर आहे. त्याला त्याच्या या वागण्याचा पश्चाताप आहे. त्याचा यापूर्वी काहीही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नाही. अशात त्याच्या शिक्षेवर विचार करायला हवा. मात्र, एडमचा सॅमवर हल्ला करणे, ग्रेसचे कपडे चोरी करणे आणि हिंसा याबाबत शिक्षेत कोर्टाने कोणताही बदल केला नाही.