काय सांगता ! होय, शेजारच्या महिलेला भेटण्यासाठी चक्क घरातूनच केला भुयारी मार्ग, पतीनं पकडलं ‘रेड हॅन्ड’

पोलीसनामा ऑनलाईन – अनेक जोडपे एकमेकांना भेटण्यासाठी काय, काय कारनामे शोधून काढतील हे सांगता येत नाही. एका विवाहित व्यक्तीने शेजारच्या महिलेला भेटण्यासाठी जो काही कारनामा केला आहे, तसा कारनामा यापूर्वी तुम्ही कधी ऐकलाही नसेल, अन् वाचला देखील नसेल. या व्यक्तीने शेजारील महिलेसोबत संबंध (Extra Marital Affair )ठेवण्यासाठी तिच्या घराखाली चक्क गुप्त भुयारी मार्ग तयार केला आहे. बरं ही घटना भारतातील नाही, बरं का तर ही घटना आहे, मेक्सिकोमधील

अल्बर्टो असे या पुरुषाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, अल्बर्टोच्या शेजारी एक महिला पतीसोबत राहते. पण जेव्हा महिलेचा पती कामावर जातो. तेव्हा भुयारी मार्गाच्या माध्यमातून तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात होता. शेजारी महिलेसोबत संबंध ठेवण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला होता. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अल्बर्टो मेक्सिकोच्या तिजुआना परिसरात राहतो. त्याने शेजारी महिला पामेलाच्या घरी जाण्यासाठी एका गुप्त भुयारी मार्ग तयार केला होता.

पण हा भांडाफोड तेव्हा झाला जेव्हा एक दिवस पामेलाचा पती जॉर्ज कामाहून लवकर घरी परतला आणि त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले पतीने पाहिलं की, अल्बर्टो एका काउचच्य मागे लपला आहे आणि नंतर तो गायब झाला. जॉर्जने बेडरूममध्ये अल्बर्टोला बराचवेळ शोधलं. पण तो काही सापडला नाही. घरातून अल्बर्टो अचानक गायब झाल्याने जॉर्जने घराची झडती घेतली तर त्याला काउचच्या खाली एक भुयारी मार्ग दिसला. जेव्हा तो या भुयारी मार्गाने पुढे गेला तर तो अल्बर्टोच्या घरी पोहोचला आणि सगळा भांडाभोड झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, भुयारी मार्ग फार चांगल्या प्रकारे तयार केला होता. मात्र हे समजू शकले नाही, की, हा भुयारी मार्ग किती दिवसाआधी तयार केला होता. पकडला गेल्यावर अल्बर्टोने जॉर्जला विनंती केली की, त्याने त्याच्या पत्नीला (अल्बर्टोच्या) या अफेअरबाबत सांगू नये. पण जॉर्जने यास नकार दिला आणि दोघे एकमेकांसोबत भांडू लागले. हे भांडण इतके वाढले की, अखेर पोलिसांना बोलवावे लागले.