‘कान’ स्वच्छ करताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते ‘इन्फेक्शन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याकडे कान स्वच्छ करण्यासाठी सर्रास बड्सचा वापर केला जातो. काहीजण तर धोकादायक पद्धतीने कान स्वच्छ करताना दिसतात. माचिसची काडी, पीन, अगरबत्तीची काडी अशा वस्तूंनी कान स्वच्द करणे हे धोकादायक ठरू शकते. बड्सनं सुद्धा निष्काळजीपणाने कान स्वच्छ केल्यास थेट मेंदूच्या अस्तरापर्यंत इन्फेक्शन होऊ शकते. अशाच एका रूग्णाला झालेला त्रास येथे आवर्जून नमूद करावा वाटतो.

बीएमजे केस रिपोर्टमध्ये या संशोधन म्हटले आहे की, इंग्लंडमधील ३१ वर्षाच्या व्यक्तीला फिट येत होती. फिट येण्याच्या १० दिवस आधी त्याच्या डाव्या कानातून स्राव येत होता, कानात वेदना होत होत्या आणि डोक्याची डावी बाजूही तीव्र दुखत होती, त्याला उलटी होत होती आणि लोकांची नावं लक्षात ठेवण्यातही अडचण येत होती.  त्यामुळे युनिव्हर्सिटी हॉस्पिटल कोवेंटड्ढीमध्ये उपचारासाठी हा व्यक्ती दाखल झाला.

हेही वाचा – ‘या’ नव्या सुविधेमुळे आता थेट डॉक्टरांनाच लागणार फोन

या व्यक्तीवर उपचार करणारे डॉ. अलेक्झांडर चार्लटॉन म्हणाले, या व्यक्तीच्या कानाची समस्या त्याच्यासाठी नवीन नव्हती. ५ वर्षांपासून त्याचा डावा कान दुखत होता आणि त्या कानातून ऐकूही येत नव्हतं. डाव्या कानात इन्फेक्शन झाल्यानं त्यावर दोनदा उपचारही झालेत. जेव्हा हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या मेंदूचं सिटी स्कॅन केलं. त्याच्या डाव्या कानाजवळ कवटीच्या आतील भागातील हाडांमधील भाग फुगीर झाल्याचं दिसलं.

या व्यक्तीला बाह्यकर्णाच्या सॉफ्ट टिश्यूंना इन्फेक्शन झालं होतं. त्याच्या कानात बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं आणि त्याच्या मेंदूच्या अस्तरापर्यंत पसरलं. या व्यक्तीवर छोटीशी शस्त्रक्रिया केली तेव्हा त्याच्या कानातून बड्स बाहेर काढण्यात आला. यामुळेच या व्यक्तीला वारंवार कानाचं इन्फेक्शन होत होतं. या व्यक्तीनं आठवडावर रुग्णालयात उपचार घेतले आणि २ महिने औषधं घेतली. आता त्याला कोणतीच समस्या जाणवत नाही.