32 वर्ष अगोदर केली होती चोरी, 22 वर्षापासून होता फरार, वयाच्या 70 व्या वर्षी अटक

नवी दिल्ली : दिल्ली जिल्ह्यातील मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी एका फरार ज्येष्ठ व्यक्तीला पकडले आहे, ज्याने 32 वर्षापूर्वी दिल्लीत गुन्हा केला आणि वयाच्या 70 व्या वर्षी अटक झाला. आरोपी फजरू 22 वर्षापासून फरार होता. मंदिर मार्ग पोलीसांनी त्याचा साथीदार दीनू (60) यास 29 ऑगस्टला अटक केली होती. दीनूसुद्धा 22 वर्षापासून फरार होतो.

नवी दिल्ली जिल्हा डीसीपी डॉ. ईश सिंघल यांच्यानुसार मंदिर मार्ग पोलीस ठाण्याचे प्रमुख विक्रमजीत सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआय जयसिंह व एएसआय इंद्रपाल सिंह यांच्या टीमने आरोपी फजरू ला त्याचे गाव बहादुरी, तालुका छोपंकी, जिल्हा अलवर राजस्थान येथून 1 सप्टेंबररोजी अटक केली.

फजरू ने दीनू व अन्य एका साथीदारासोबत मिळून 1989 मध्ये आंबेडकर नगर, दिल्लीत चोरी केली होती. त्यांनी दुकानाचे शटर तोडून महागडे कपडे आणि मोठ्या प्रमाणात कॅश पळवली होती. आंबेडकर नगर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी त्यावेळी फजरू आणि अन्य साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याकडून चोरलेले कपडे जप्त केले होते.

कोर्टाने नंतर फजरू ला जामीनावर सोडले होते. यानंतर तो कोर्टातही कधी हजर झाला नाही आणि कोर्टाने फजरू ला 4 जून, 1998 ला फरार घोषित केले होते. फजरू सराईत घोरफोड्या होता. तो रात्री दुकाने फोडत असे. सोबत गोवंश सुद्धा दिल्लीतून घेऊन जात होता.हरियाणा आणि राजस्थान पोलिसांकडून त्याला अनेक गुन्ह्यात चारवेळा अटक झालेली आहे.

फजरू अलवर जेल, राजस्थान, भोंडसी जेल हरियाणा, किशनगढ जेल राजस्थान आणि तिहार जेल दिल्लीमध्ये जेरबंद राहिलेला आहे. पटियाला कोर्टने फजरू ला 4 जून, 1998 ला फरार घोषित केले होते.