Pune News : Facebook वरून विवाहितेने तरुणाला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, म्हणाली – ‘माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन –  फेसबुकच्या माध्यमातून एका विवाहितेने 20 वर्षीय तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे म्हणून पैशांची मागणी केली, तसेच पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. यामुळे सर्व प्रकाराला कंटाळून तरुणाने तणावात येऊन आत्महत्या केली. आळंदी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहित महिलेविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला तरुण हा वाणिज्य शाखेच्या दुस-या वर्षात शिकत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहितेने त्याला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांच्यात फेसबुक मेसेंजरद्वारे अश्लील चॅट सुरु झाले, हे सर्व प्रकरण अवघे पंधरा दिवस चालले. परंतु, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे म्हणून 20 वर्षीय तरुणाकडून विवाहित महिलेने पैश्यांची मागणी केली. पैसे न दिल्यास फेसबुकवरील मेसेज नातेवाईक आणि इतरांना पाठवण्याची धमकी तरुणाला देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व प्रकरणाला तरुण कंटाळला होता. तो मानसिक तणावात गेला. हा सर्व प्रकार 18 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2020 या कालावधीत घडला. अखेर तरुणाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने बहिणीला फोन करून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. संबंधित महिला फसवत असून पैसे मागत असल्याचे देखील बहिणीला सांगितले होते. त्यानंतर मात्र तरुणाने फोन बंद करून तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.