किडनी तस्करीच्या जाळ्यात अडकला अकोल्याचा तरुण ; ‘गुप्तहेर स्टाईल’ने लिहिली सुसाईड नोट

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एका टायर कंपनीत काम करणाऱ्या एका अकोल्याच्या तरुणाने आपल्या शेतात औषध खाऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या सुसाईड नोट मध्ये त्याने लिहिले आहे की, त्याच्या आत्महत्येसाठी एक आंतरराष्ट्रीय किडनी तस्कर डेव्हिड नामक डॉक्टर जबाबदार असल्याचे सांगितले आहे.
Akola
१२ करोड रुपयाचे अमिष
घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीतमुळे अतुल मोहोड आंतरराष्ट्रीय किडनी तस्कर टोळीच्या संपर्कात आला होता. या टोळीतील डेव्हिड नामक डॉक्टरने त्याला १२ करोड रुपये देण्याचे अमिष दाखवले होते. या तरुणाने नोट मध्ये लिहिले आहे की, माझ्या मजबुरीचा गैरफायदा घेत जास्त पैसे देण्याचे मला अमिष दाखवले गेले. हा व्यक्ती सुरवातीला नोंदणीच्या नावाखाली २ लाख घेत असत आणि लोकांना दोन्ही बाजूंनी फसवत होता. त्यामुळे या किडनी टोळीच्या संपर्कातआलेल्या लोकांची किडनी देण्याची मानसिकता तयार होत असे.

अशा प्रकारे अतुल चक्रव्यूहात अडकत गेला
अशा प्रकारे अतुल मोहोड हा चक्रव्यूहात अडकला गेला. डॉ. डेव्हिडला याने सतत संपर्क केला. त्याला सांगितले गेले होते की, त्याच्या बँक खात्यात ६ करोड रुपये जमा होतील. परंतु यामध्ये खूप वेळ गेला. मिळालेल्या माहितीनुसार या मुलावर कर्जाचा बोजा वाढला होता. तो त्याच्याने परतफेड करणे अवघड होत चालले होते. त्यासाठी त्याला आपली शेती गहाण ठेवावी लागली होती. त्याच्या बायकोचे दुसरे लग्न झाल्याचा उल्लेख सुद्धा पत्रामध्ये आहे. त्यावरून हे लक्षात येते की, तो मानसिकरीत्या व्यवस्थित नव्हता. तसेच मित्रांकडून उधार घेतलेले पैसे सुद्धा परत करणे बाकी होते.

कर्जात बुडाला होता
अतुलने उधार घेतलेले पैसे आणि बँकेचे कर्ज परत करणे अवघड होऊन बसले होते. सर्व बाजूंनी आर्थिक संकटाचा सामना करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी तो अकोल्याला आला होता. रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्यामुळे घरच्यांनी शोध घेतला तेव्हा दुसऱ्या दिवशी शेतात त्याची बॉडी एका झाडाखाली दिसून आली. तसेच एका बॉक्स मध्ये पोलिसांना त्याने लिहिलेली सुसाईट नोट सापडली.
Suicide note
पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे
सुसाईड नोट मध्ये केला गेलेला आंतरराष्ट्रीय किडनी तस्करीच्या टोळीचा उल्लेख यावरून पोलीस परेशान झाले आहेत. असा प्रकारचे रॅकेट जे गरीब लोकांना फसवण्याचे आणि त्यांचे पैसे लुबाडण्याचे काम करत असेल तर त्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला आहे. सुसाईट नोट मध्ये त्याने लिहिले आहे की, डॉक्टर डेव्हिड सोबत आपला एक मित्र तिवारी याचा सुद्धा उल्लेख केला आहे. स्थानिक लोकांना फसवून किडन्या आंतरराष्ट्रीय बाजारात विकत असल्याचा हा प्रकार असल्यामुळे या गोष्टीचा पोलिस बारकाईने तपास करत आहेत.

अतुलच्या घरवाल्यांनी आरोपी वर कडक कारवाईची मागणी केली.
तसेच अतुलच्या बायकोने आणि आई ने सांगितले की, तो मागच्या अनेक दिवसापासून खूप परेशान होता. त्याला एखादा व्हाट्स अ‍ॅप मेसेज आला कि तो खूप रागावत असे. अतुलच्या आत्महत्येसाठी त्याचा मित्र तिवारी आणि डॉक्टर डेव्हिडचं जबाबदार असल्याचे यांनी सांगितले. तसेच यांच्यावर कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like