‘माझं मत वाया गेलं’ म्हणत ‘त्यानं’ केली ‘डायरेक्ट’ उध्दव ठाकरेंविरूध्द पोलिसांत ‘तक्रार’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आणि शिवसेनेचे बिनसल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी मिळते जुळते घेतले. आता सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला असताना राज्यात लवकरच सत्तास्थापन होईल अशी शक्यता वाढली आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत माजी खासदार चंद्राकांत खैरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

रत्नाकर भीमराव चौरे या तक्रार दाराने तक्रारीत म्हणले आहे की विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळावली आणि सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन फसवणूक केली आहे. तसेच उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करत अशी मागणी रत्नाकर चौरे यांनी केली.

मत वाया गेलं –
शिवसेना निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने तक्रारदार रत्नाकर चौरे यांनी यावर अपेक्ष घेतला आहे. निवडणूकीत महायुतीच्या नावे मते मागितली आणि आता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याची तक्रार रत्नाकर चौरे यांनी केली.

उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांनी 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केले की हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना भाजप महायुतीला मतदान करा असे आव्हान त्यांनी केले. त्यामुळे मी आणि माझ्या कुटूंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीच्या प्रदीप जैस्वाल यांना मतदान केले. परंतू निकालानंतर महायुती बरोबर सरकार स्थापन न केल्याने शिवसेनेला आघाडीबरोबर गेली. त्यामुळे मी भाजप समर्थक आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेले मतदान वाया गेले. हिंदुत्वाच्या नावे मते मागून माझी फसवणूक करण्यात आली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा असे रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हणले आहे.

या 5 मुद्यावर चालणार महाशिवआघाडीचे सरकार –
गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या वेगवेगळ्या विचारधारा असलेले सरकार राज्याला मिळणार आहे. त्यामुळे घाई करुन भविष्यात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सर्व मुद्यांवर चर्चा करण्यात येत आहेत. काँग्रेसने देखील यासाठी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेसमोर काही अटी ठेवल्या आहेत असे कळते आहे.

या कारण आहे शिवसेना आणि काँग्रेसची जनमानसात असलेली वेगळी प्रतिमा. शिवसेनेचे कडवट हिंदुत्व रोखण्याचे काँग्रेस समोर आव्हान आहे. कारण राम मंदिर, नागरिकता संशोधन विधेयक, कलम 370 या मुद्यावरुन मतभेद आहेत. त्यांनी मांडलेल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या मुद्यावरुन भविष्यात अडचणी येऊ नये यासाठी सत्तास्थापनेआधी काँग्रेसकडून काही अटी घालण्यात येत आहे. त्यामुळे महाशिवआघाडीत हे मुद्दे महत्वाचे असतील.

1. सरकार स्थापनेत जातीय अजेंडा नको.
2. समान किमान कार्यक्रमाबाबत सर्व पक्षांनी जाहीरनामा समाविष्ट करावा.
3. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितले की ते खरे उदारमतवादी पक्ष आहेत.
4. संयुक्त समित प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांच्या आधारे पोर्टफोलिओ वाटप करण्याचा निर्णय घेईल.
5. नव्या युतीने धर्मनिरपेक्ष या शब्दावर जोर दिला पाहिजे, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे.

Visit : Policenama.com