केरळमध्ये ‘हा’ व्यक्ती दररोज करतो ‘कोरोना देवी’ची पूजा, अखेर त्यानं सांगितलं ‘खरं’ कारण

कोल्लम : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूच्या संकटामुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अलीकडे देशाच्या विविध भागातून कोरोना देवीची पूजा केल्याच्या बातम्या आल्या आहेत. आता केरळमधून अशीच एक बातमी समोर आली आहे, जिथे या प्राणघातक विषाणूची देवता म्हणून एक व्यक्ती रोज पूजा करत आहे. याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो केरळमधील कडक्कल येथील असून येथील अनिलनाच्या घरात एक मोठी खोली दिसत आहे. या ठिकाणी ‘सार्स सीओव्ही 2’ या विषाणूची थर्माकोलवर लाल रंगाची प्रतिकृती आहे. ज्या विषाणूने जगभरातील कोट्यावधी आणि भारतात तीन लाखाहून अधिक जणांना संक्रमित केले आहे अशा विषाणूची ही प्रतिकृती आहे.

अनिलान म्हणतात की, मी कोरोना विषाणू ची देवी म्हणून उपासना करीत आहे आणि आरोग्य व्यावसायिक, पोलीस आणि वैज्ञानिक, अग्निशमक कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी आणि व्हायरस विरुद्ध लढणाऱ्या इतरांसाठी मी रोज पूजा करीत आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलकडे दुर्लक्ष करत अनिलन म्हणाले की, लोक कोरोना देवीची पूजा करण्यासाठी त्यांची चेष्टा करत आहेत. पण हा माझा जनजागृती करण्याचा मार्ग असल्याचे त्याने एका वृत्तवाहीनीला सांगितले. अनेक लोकांनी सोशल मीडियावर त्याच्या या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काही लोक म्हणतात की, तो चर्चेत येण्यासाठी असे करीत आहे, तर काहींनी याला अंधश्रद्धा म्हटले आहे. सरकारकडून धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या अनिलन म्हणाले की, लोक त्यांच्या घरात राहून उपासना करू शकतात.

ते म्हणाले की, अशा वेळी जेव्हा विषाणूवर नियंत्रण मिळवता येत नाही, तेव्हा लोकांना धार्मिक स्थळांवर जाण्याची परवानी दिली तर अधिकच नुकसान होईल. ते भाविकांना त्यांच्या घरी राहून पूजा करण्यासाठी आणि कोरोना देवीला पैसे अर्पण करण्यासाठी उद्युक्त करत नाहीत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना लेखक, समीक्षक व वक्ते सुनील पी. इलायदम म्हणाले की , एकीकडे आपला समाज आणि तिथले लोक त्यांच्या ज्ञानाने आणि पदवीसाठी परिचित आहे आणि ते शिक्षक, प्राध्यापक, तांत्रिक, तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि व्यावसायिक होतात. त्याचबरोबर अशा अंधश्रद्धेवर अजूनही आमचा विश्वास आहे. विशेष म्हणजे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील अनेक ग्रामीण भागात लोक या साथीचा नाश करण्यासाठी कोरोना देवीची उपासना करताना दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी कोरोनापासून मुक्ती मिळावी यासाठी गावातील लोकांनी 400 बकऱ्यांचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.