अजब ! बिझनेस दौऱ्यावरील व्यक्तीचा सेक्स दरम्यान मृत्यू , कोर्टाने ठरवलं कंपनीला जबाबदार

पॅरिस : वृत्तसंस्था – फ्रान्समधील पॅरिसमध्ये एक अजब घटना घडली आहे जिच्याबद्दल माहिती झाल्यास तुम्हालादेखील आश्चर्य वाटेल. येथील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीचा बिझनेस दौऱ्यादरम्यान शारीरिक संबंधादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालात व्यक्तीच्या मृत्यूसाठी कंपनीला जबाबदार धरत कर्मचाऱ्याच्या कुरुंबास भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने हा निर्णय प्रकरणानंतर तब्बल ८ वर्षानंतर दिला.

अशी घडली घटना
झेव्हिअर एक्स नावाच्या एका व्यक्तीला २०१३ मध्ये रेल्वे सेवा कंपनीने फ्रान्समध्ये आयोजित एका बिझनेस बैठकीसाठी पाठवले होते. या दौऱ्यावर असताना एका महिलेशी लैंगिक संबंध ठेवताना या व्यक्तिचा हृदयविकाराने जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी कंपनीच्या विरोधात तक्रार केली असता न्यायालयात ८ वर्षे दावे प्रतिदावे चालले.

कंपनीचा युक्तिवाद :
कंपनीच्या वतीने कोर्टात केलेल्या युक्तिवादात म्हटले आहे की, ‘ज्या हॉटेलवर कर्मचाऱ्याला बैठकीसाठी पाठवलं गेलं होतं तिथे तो पोहोचलाच नाही. तर मृत्यूच्या वेळी तो भलत्याच ठिकाणी होता. कंपनीने त्याला बिझनेस टूरवर कामकाजासाठी पाठवलं होतं आणि वैयक्तिक आयुष्यासाठी नाही. मात्र मृत्यूच्या वेळी व्यक्ती आपले खाजगी आयुष्य जगत होता ज्याचा कामकाजाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे न्यायालयाने कंपनीला कर्मचार्‍याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नये.’

कोर्टाचा निर्णय :
वित्तसंस्थांच्या माहितीनुसार कोर्टाने कंपनीचा युक्तिवाद मान्य न करता कंपनीविरीधात निर्णय दिला. न्यायाधीशांनी आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे की, ‘बिझनेस दौर्‍यावर असलेल्या कर्मचाऱ्यास संपूर्ण कामकाजासाठी संरक्षण असले पाहिजे, कंपनीने आपली जबाबदारी टाळू नये.’ अंतिम निर्णयात न्यायालयाने कंपनीला मृत कर्मचार्‍याच्या कुटूंबाची भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले आहे.