home page top 1

गणेश विसर्जन मिरवणूकीत ‘नागिन’ डान्स करताना जीव गमावला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एक विचित्र मात्र धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत एका व्यक्तीचा नागीण डान्स करताना मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन व्यक्ती डान्स करताना दिसून येत आहेत. त्यांना नाचताना कोणतेही भान नसल्याचे यामध्ये दिसून येत आहे.

या व्हिडिओत तुम्हीं पाहू शकता कि, काही जण नागीण डान्सवर मोठ्या प्रमाणात नाचताना दिसून येत आहेत. या सगळ्यांना काहीही कळत नसते. तितक्यात त्यातील एकजण जोरात खाली कोसळतो. मात्र सत्य घटना समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. मृत व्यक्तीचे नाव गुरुचरण ठाकुर असून त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे आता पोलीस त्याच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, गुरुवारी अनंत चतुर्दर्शीच्या दिवशी देशभरातील भाविकांनी आणि भक्तांनी गणपतीला मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला. त्यामध्ये अनेक ठिकाणी विविध घटना घडून अनेक भक्तांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like