Lockdown 3.0 : पुण्यात झाला युवकाचा मृत्यू, वडिलांनी पुतळ्यावर केले अंत्यसंस्कार, म्हणाले0 – ‘हेच नशीब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोरखपूरच्या झंगहा भागातील अमहिया गावचा रणविजय उर्फ गुड्डू (वय 32) याचा पुण्यात आजाराने मृत्यू झाला. पैशांचा अभाव आणि लॉकडाऊनमुळे त्याचा मृतदेह गावात पोहोचू शकला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या वडिलांनी गावात पुतळा बनवून त्याचे अंत्यसंस्कार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, झंगहा पोलीस स्टेशन परिसरातील अमहिया गावचा रहिवासी मुनीबचा मुलगा रणविजय हा काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकासह नोकरीच्या शोधात पुण्यात गेला होता. तो पेंट-पॉलिशचे काम करत असे. वडील मुनिब यांनी सांगितले की, रणविजयला कित्येक दिवस ताप होता. पुण्यातच त्याच्या मामाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. रविवारी रात्री फोनवरून बातमी मिळाली की, रणविजयचे निधन झाले आहे. मात्र, लॉकडाऊन आणि दारिद्र्यामुळे मुनिबने हेच नशिबात असेल असे म्हणत, रणविजयचे अंत्यसंस्कार पुण्यातच करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सोमवारी प्रतिकात्मक पुतळ्यांना अग्नी देत मुलाचा अंत्यसंस्कार केला.