‘रामलीला’मध्ये रामाच्या वियोगाचा ‘सीन’ ! दशरथाची भूमिका करणार्‍याचा गेला ‘जीव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या आजूबाजूला उत्क्रुष्ट अभिनयाच्या माध्यमातून विविध कलाकार रामलीला सादरीकरणामध्ये जिवंतपणा आणण्याचा नेहमीच प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. त्यासाठी कलाकार वेगवेगळी वेशभूषा परिधान करतात. तसेच प्रभावी संवाद कौशल्याचा आपल्या अभिनयात वापर करतात. या सर्व गोष्टींमुळे रामलीला प्रत्यक्षात आपल्या डोळ्यासमोर घडत असल्याचा आपल्याला अनुभव येत असतो.

रामलीलेत अभिनय करताना घेतला शेवटचा श्वास
असाच एक प्रकार हरियाणा राज्यातील झंझन जिल्ह्याच्या मलसीसर भागात घडला आहे. या ठिकाणी रामलीला सादरीकरण करत असताना एका प्रसंगात राजा दशरथ प्रभू रामचंद्रांना निरोप देत असतात. त्या वियोगात एक कलाकार एवढा गुंतला गेला जेणेकरून तेथेच त्याचा मृत्यू झाला. येथील कंकडेऊ गावातील रामलीला सादरीकरणामध्ये एक असा प्रसंग आला ज्यामध्ये राजा दशरथाचा मरण्याचा अभिनय करावयाचा होता. त्यावेळी कुंदनलाल जे राजा दशरथाचा रोल करत होते त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. मात्र लोकांना कुंदनलाल आणखी सुद्धा अभिनय करत आहेत असेच वाटत होते. परंतु प्रत्यक्षात कुंदनलाल यांचा मृत्यू झाला होता.

रामलीला पाहण्यासाठी आलेले भाविक झाले भावनिक
केवळ अभिनय करत असलेल्या कुंदनलाल यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे रामलीला पाहण्यासाठी आलेले लोक रडू लागले. या प्रसंगानंतर लागलीच रामलीला समाप्त झाली असे घोषित करण्यात आले. कुंदनलाल याचे पार्थिव शरीर रामलीला कमिटीच्या माध्यमातून त्यांच्या घरी पाठवण्यात आले. तेथे त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी जमली होती. अभिनय करत असताना त्यांचा मृत्यू झाला यावर लोकांना विश्वासच बसत नव्हता.

३० वर्षानंतर घटनेची पुनरावृत्ती
मिळालेल्या माहितीनुसार कुंदनलाल ६५ वर्षांचे होते. ते मागच्या अनेक वर्षांपासून रामलीला मध्ये राजा दशरथाचा रोल करत होते. लोकांना त्यांचा अभिनय खूप आवडत असे. लोक त्यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक सुद्धा करत असत. सर्वात आश्चर्याची गोस्ट म्हणजे तब्बल ३० वर्षांपूर्वी कुंदनलाल यांचा भाऊ जगदीश यांचा सुद्धा रामलीला मध्ये राजा दशरथाचा रोल करत असताना मृत्यू झाला होता.

Visit – policenama.com 

 

You might also like