आश्‍चर्यकारक ! ‘हा’ व्यक्‍ती जेवण म्हणून खातो 1 KG काच आणि बल्ब, 45 वर्षापासुनची जुनी सवय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माणसाला भूख लागली की माणूस जेवण करतो. परंतू एक भयानक प्रकारामध्ये मध्यप्रदेशातील एक व्यक्ती जेवण म्हणून अन्न नाही तर काचा खातो. भात, चपाती असे अन्न न खाता काचा खातो आणि पोट भरतो. हा व्यक्ती मागील 40 – 45 दिवसापासून काचा खात आहे.

मध्यप्रदेशच्या डिंडोरीमध्ये राहणारा द्याराम साह यांनी सांगितले की मागील 40 – 45 वर्षापासून त्याला काचा खाण्याची सवय आहे. हा व्यक्ती पेशाने वकील आहे. ते म्हणाले की, काचा खानं हे माझ्यासाठी एखाद्या सवयीसारखं आहे आणि त्यामुळे माझे दात देखील खराब झाले आहे.

द्याराम साह यांनी लोकांना असे करण्यापासून अडवले आहे. ते म्हणाले की, मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही असे काही करु नका ते तुमच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी घातक आहे. त्यांच्या या सवयी बद्दल सांगताना ते म्हणाले की, शरीराला त्रास होत असल्याने मी स्वत: हे बंद करु इच्छित आहे.

द्याराम यांच्या मते त्यांना काच खाण्याची सवय वयाच्या 14-15 व्या वर्षी लागली. पहिल्यांदा दिवसाला मी 1 किलो पेक्षा जास्त काचा चावून खायचो त्यामुळे माझे दात खराब झाले. त्यांची पत्नी देखील त्याचा हा प्रकार पाहून चकीत झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like