धक्कादायक ! Cricket वरील सट्ट्यामुळे होत्याचे नव्हते झाले ; वडिलांची ३ मुलींसह विष खाऊन आत्महत्या

वाराणसी : वृत्तसंस्था – जुगारासाराख्या वाईट व्यसनामुळे वाराणसी येथे एक कुटुंब उद्धवस्त झाले आहे. क्रिकेटच्या सामन्यांनावर सट्टा लावण्याची सवय दीपक कुमार याला होती. सट्टयात सर्वकाही हरल्यामुळे दिपकने पोटच्या तीन मुलींना विष देऊन स्वत: देखील आत्महत्या केली आहे. या सर्वात मात्र आईचा जीव वाचला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वाराणसी येथील लक्सा भागात दीपक कुमार आणि त्याचे कुटुंब राहत होते. दीपक कपडे विकण्याचा व्यवसाय करीत होता. पत्नीसह तो आपल्या तीन मुली निबिया (९), अद्वितीय (७) आणि रिया (५) यांच्यासोबत राहत होता. तसेच दिपकच्या भावाचे कुटुंब आणि आई हे देखील एकत्र राहत होते. दिपकला सट्टा लावण्याची सवय होती. आयपीएलच्या सामन्यावर देखील त्याने सट्टा लावला होता मात्र यात तो पैसे हारत होता.

दिपकच्या तीन मुली आंगणात झोपल्या होत्या काही वेळाने दीपक तेथे आला आणि तिन्ही मुलींना आता घेऊन गेला. त्यानंतर दिपकने आपल्या तिन्ही मुलींना काहीतरी खायला दिले. त्यानंतर मात्र दीपक आणि तिन्ही मुलींना उलट्यांचा त्रास होऊ लागला अशी माहिती पोलिसांना दिपकची पुतणी साक्षी हिने दिली आहे.

तीन मुलींसोबतच दीपक यांनादेखील उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना कबीरचौरा रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान चारही जणांचा मृत्यू झाला. दीपक आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज भांडणं व्हायची. त्यामुळेदेखील तो तणावाखाली होता, असं शेजारच्यांनी सांगितलं. आयपीएलवरील सट्ट्यात सतत हरल्यानं दीपक कर्जबाजारी झाला होता. दीपकनं मुलांच्या जेवणात विष कालवलं आणि स्वत:ही विष घेतलं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Loading...
You might also like