सुसाईड नोटमध्ये पतीनं लिहिलं, पत्नी म्हणत होती की -‘मी कितीही पुरुषांसोबत ‘संबंध’ ठेऊ माझी मर्जी’

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – हरियाणामधील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली असून आपल्या पत्नीच्या अवैध संबंधामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने यामध्ये म्हटले आहे. मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या भावाच्या पत्नीचे दोन युवकांशी अवैध संबंध असल्याचा आरोप केला आहे तर पत्नीने आरोप नाकारत आपण पती आणि दोन मुलांसह आनंदी होतो असे म्हटले आहे. बलवीर सिंह असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

दोन पुरुषांबरोबर होते अवैध संबंध
यमुनानगरमध्ये राहणाऱ्या बलवीर सिंह याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पत्नीचे दोन युवकांशी असलेल्या अवैध संबंधामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतक मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे.

भावाने सांगितली हि गोष्ट
भावाने दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे कि, त्याची पत्नी त्याला दररोज टोमणे मारत असे, मी कितीही पुरुषांबरोबर संबंध ठेवू शकते, तुला यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, असे त्याची पत्नी त्याला म्हणत असे.

पत्नी म्हणते पती आणि मुलांबरोबर आनंदी होते
याविषयी पत्नीला विचारण्यात आले असता तिने सांगितले कि, ती आपल्या पती आणि दोन मुलांबरोबर आनंदी होती. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली? हे मला माहित नाही. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाअंती योग्य ती कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like