ISRO चा शास्त्रज्ञ असल्याचं सांगत केलं लग्‍न, पत्नीनं केली ‘पोलखोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान २ मोहीमेनेनंतर ISRO आणि वैज्ञानिक विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे याची चर्चा होत आहे. राजधानी दिल्लीच्या द्वारका भागातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे, जिथे एका व्यक्तीने लग्नासाठी कट रचला होता आणि त्याने स्वत: ला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) वैज्ञानिक म्हटले आहे.

लग्नापूर्वी दाखवली बनावट कागदपत्रे :
मिळालेल्या माहितीनुसार, असा आरोप आहे की द्वारका येथील एका व्यक्तीने स्वत: ला इस्रोचे वैज्ञानिक म्हटले आणि पीएचडी झालेल्या विद्यार्थिनीशी लग्न केले. असे सांगितले जात आहे की या बनावट कामासाठी त्याने आय-कार्ड सोबत अनेक कागदपत्रेही सादर केली. ज्यामुळे त्या मुलीच्या कुटूंबाला खात्री पटली की ती व्यक्ती वैज्ञानिकच आहे.

जेव्हा पत्नीला संशय आला :
लग्नानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की त्याने संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO) मध्येही काम केले आहे आणि आता तो अंतराळवीर प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेच्या नासा येथे जात आहेत. जेव्हा पत्नीला त्याच्या बोलण्याबद्दल संशय वाटला तेव्हा तिने अ‍ॅपद्वारे त्याचे लोकेशन तपासले. ज्यावरून हे सिद्ध झाले की तो अमेरिकेत नाही तर गुडगाव येथे आहे.

ज्यानंतर पत्नीच्या कुटुंबियांनी त्याची कसून चौकशी केली, त्यानंतर त्याचा पत्ता बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पीडित मुलीने द्वारका उत्तर पोलिस ठाण्यात तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वी त्याने सांगितले होते की तो डीआरडीओमध्ये काम करत असे आणि नंतर त्याने इस्रो जॉईन केले आहे. लग्नाआधी त्याने इस्रो आणि डीआरडीओचे आयकार्ड्स आणि बरीच कागदपत्रेही दाखविली होती.

visit : Policenama.com