बायकोच बोलणं ऐकायला लागू नये म्हणून केलं बहिरेपणाचं नाटक , ६२ वर्षांनतर पत्नी कोर्टात …

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – तब्बल ६२ वर्ष एकत्र राहिल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या एका पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आता तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की नेमके असे काय झाले , की तब्बल ६२ वर्षानंतर घटस्फोटाचा विचार केला आहे. तर त्याचे झाले असे की, घटस्फोटाचा अर्ज करणाऱ्या महिलेचा पती वर्षानुवर्षे चक्क बहिरा असल्याचे नाटक करत होता. अमेरिकेतील कनेक्टिकटमधील वॉटरबरी शहरात ही अनोखी घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ८० वर्षांच्या डोरोथी यांनी ८४ वर्षीय पती बेरी डावसन यांच्यापासून काडीमोड घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टही अवाक झालं. ६२ वर्षांपूर्वी डोरोथी आणि बेरी विवाहबंधनात अडकले होते. या सहा दशकांच्या कालावधीत मिस्टर बेरी यांनी पत्नीसमोर एक अवाक्षरही काढलं नाही. इतकी वर्ष त्यांनी आपण मूकबधीर असल्याचं सर्वांना भासवलं होतं.पतीची भाषा समजावी, यासाठी डोरोथी आणि त्यांची मुलं सांकेतिक भाषा शिकल्या. तरीही पती आपल्याशी फार संवाद साधत नसल्याची खंत डोरोथी यांच्या मनात होती.

बायकोचं बोलणं ऐकावं लागू नये म्हणून केले बहिरेपणाचे नाटक

बेरी आणि डोरोथी यांना सहा मुलं, सूना-जावई आणि १३ नातवंडं आहेत. बेरी आजोबांना बोलता – ऐकता येत नाही , यावर सर्वांचा विश्वास बसला होता . मात्र एके दिवशी त्यांचं बिंग फुटलं आणि अख्ख्या कुटुंबाच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण झाली . बायकोचं ऐकावं लागू नये, म्हणून बेरी यांनी मूकबधीर असल्याचं सोंग घेतलं होतं. ६२ वर्ष ते त्यांच्या शरीरात इतकं भिनलं , की कोणालाच त्यांच्या खोटारडेपणाची शंकाही आली नाही. मात्र अचानक वस्तुस्थिती समोर आली आणि पत्नीला विभक्त होण्यावाचून पर्याय दिसेनासा झाला.

आपल्या पत्नीला दुखावण्याचा किंवा फसवण्याचा बेरी यांचा हेतू नव्हता, हेच त्यांच्या ६२ वर्षांच्या संसाराचं गुपित आहे, असा दावा बेरी यांच्या वकिलाने कोर्टात केला. मात्र डोरोथी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी मानसिक त्रास झाल्याबद्दल नुकसान भरपाई, पोटगी आणि काही वस्तूंची मागणी केली आहे. आता कोर्टात समोरासमोर आल्यावर दोघं काय ‘बोलणार’ याची कोर्टालाही उत्सुकता असेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp chat