Video : सेल्फीचा ‘थरार’ कॅमेऱ्यात ‘कैद’ ; तरुण इमारतीवरून कोसळला

मुंबई पोलिसांकडून व्हिडिओ जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सेल्फी काढण्याचं फॅड तरुणाईमध्ये आहे. मात्र या सेल्फीच्या नादात अनेकांनी आतापर्यंत आपला जीव गमावला आहे. कुणी उंचावर, टेकडीवर, दरीजवळ, पाण्याजवळ सेल्फी काढताना आपला जीव गमावला. त्यानंतर एका बहुमजली इमारतीवरून कोसळलेल्या तरुणाचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी जारी केला आहे.

मुंबईत एक तरुण सेल्फी काढताना बहुमजली इमारतीवरून खाली कोसळला. सेल्फीचा मोह तरुणाईला महागात पडला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जनजागृतीपर व्हिडीओ जारी केला आहे. मुंबई पोलिसांनी एक ट्वीट केलं असून त्यात हा व्हिडीओ देण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तरुण सेल्फी काढत असताना एका बहुमजली इमारतीवरून तोल गेल्याने खाली कोसळला आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. हे मात्र समजू शकले नाही.

You might also like