अभिनेत्री होण्यासाठी तिनं 2 वर्षाच्या मुलाला सोडले, आता त्यानेच आईकडे मागितली ‘एवढ्या’ कोटींची भरपाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईच्या उच्च न्यायालयात एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या आई विरोधातच दीड कोटी रुपयांच्या भरपाईचा दावा ठोकला आहे. याचिका दाखल केलेल्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, जेव्हा तो दोन वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईने त्याला अभिनेत्री होण्यासाठी रेल्वेमध्ये सोडले होते. एवढेच नाही तर नंतर महिलेने त्याला आपला मुलगा मानण्यास देखील नकार दिला होता. त्यामुळे त्या व्यक्तीने न्यायालयात आईकडून दिढ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.

मेकअप आर्टिस्ट असलेल्या श्रीकांत सबनीस यांची ही कहाणी आहे. त्यांनी याचिकेत म्हंटले आहे की, माझी आई आरती महस्करने दीपक सबनिस यांच्याशी विवाह केला होता. 1979 मध्ये याचिकाकर्ते श्रीकांत यांचा जन्म झाला असल्याचे ते सांगतात. आरतीला चित्रपटात काम करायचे होते. म्हणून ती मुंबईला आली आणि मला एका रेल्वेमध्ये सोडून दिले त्यानंतर स्टेशन वरील एका अधिकाऱ्याने श्रीकांतला पाळणाघरात सोडले असल्याची माहिती त्यांनी याचिकेत दिली.

नंतर आरतीने उदय महस्कर यांच्याशी विवाह केला ज्यांचा संबंध बॉलिवूडमधील संगीत इंडस्ट्रीशी आहे. श्रीकांतने आरती आणि उदय या दोघांकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/