जेवणात सापडला ‘या’ माणसाला महागडा मोती. झाला लखपती !

न्यू यॉर्क : वृत्तसंस्था – कोणाचं नशीब कधी बदलेल हे काही कोणाला  सांगता येत नाही. अनेक जणांना याचा अनुभव आलाही असेल.  एखाद्या घटनेने त्यांचे नशीब पालटले आपण पहातच असतो. न्यूयॉर्क मधील६६ वर्षीय रिक अँटोश  यांना असाच अनुभव आला. न्यू यॉर्कमधील Oyster Bar मध्ये रिक जेवण करत होते. खाता खाता त्यांना  अचानक काहीतरी वेगळं लागलं. त्यांनी  ते बाहेर काढलं तर कळालं तो मोती आहे. तोही साधारण नाही तर महागडा.

Oyster Bar इथे केवळ शिंपल्यापासून तयार केलेलेच पदार्थ मिळतात. रिक हे आपल्या  मित्रांसोबत  जेवण करत होते. त्यावेळेस त्यांना दाताखाली काहीतरी खड्यासारखे आढळले. या बाबत त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरकडे तक्रार केली. मॅनेजरने यासाठी त्यांची माफीही मागितली.

रिक ने तो मोती सांभाळून ठेवला आणि नंतर त्याची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्या मोतीची किंमत ऐकून त्यांनाही डाक्का बसला. त्या मोती ची किंमत २ हजार डॉलर ते ४ हजार डॉलर इतकी होती. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत १.५० लाख ते २.८४ लाख इतकी होते. रिक ने या बाबत एक व्हीडीओ मुलाखतही दिली असून  रिकने हा मोती अजूनही आपल्याजवळ सांभाळून ठेवला आहे.