‘त्यानं पँटची चेन उघडली आणि…’, तिनं सांगितला ‘धक्कादायक’ अनुभव

मुंबई : वृत्तसंस्था – झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने सध्या एक गंगा हे नाव चर्चेत आहे. गंगा एक ट्रान्सजेंडर असून तिचं खरं नाव प्रणीत हाटे आहे. रिअ‍ॅलिटी शोमुळे गंगा आज घराघरात पोहचली आहे. झी युवावरील या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनात अद्वैतला साथ देणारी गंगा ट्रान्सजेंडर असून मराठी मालिका विश्वात पहिल्यांदा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला सुत्रसंचालनाची संधी मिळाली आहे. मात्र तिचा प्रणित ते गंगापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गंगाने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत खुलासा केला आहे.

ganga pranit

ट्रान्सजेंडर ही त्यांची खासगी मालमत्ता असल्यासारखे वागतात
गंगाने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मी ट्रान्सजेंडर असल्याने अनेकदा लोक मला गृहीत धरतात असे वाटतं. मी एकदा रात्री अकरा वाजता एका रेल्वे स्थानकावर शुटिंग करत होते. माझे दिग्दर्शकसुद्धा माझ्यासोबत होते. गर्दी नसलेल्या रेल्वे स्थानकाचं शुटिंग करायचे ठरले होते. त्यामुळे आम्ही रात्रीची वेळ निवडली. दिग्दर्शकाच्या मागे उभा असलेल्या व्यक्तीने अचानक त्यांच्या पँटची चेन उघडली आणि अश्लिल हातवारे केले.

हा प्रकार पाहून मला धक्का बसला. असे वागण्याचे धाडस लोक कसे काय करु शकतात हेच कळत नाही. लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे मला त्यावेळी समजलं. मी जर मुलगी असते तर कदाचित तो व्यक्ती तशाप्रकारे वागला नसता. मुलीच्या बाबतीत असे काही करताना दोनदा विचार केला असता पण ट्रान्सजेंडरविरोधात नाही करत असे त्या प्रसंगावरून समजले. ट्रान्सजेंडर म्हणजे त्यांची खासगी मालमत्ताच आहे असे लोक वागतात. लोकांची ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे गंगाने सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like