संतापजनक ! चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला उकळत्या तेलातून काढायला लावल नाणं

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची अग्निपरीक्षा घेत तिला उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयाचे नाण काढायला लावण्याची संतापजनक घटना परंडा (जि. उस्मानाबाद) येथे समोर आली आहे. पत्नीसोबत केलेल्या या अमानुष कृत्याचा पतीने स्वतःच व्हिडीओदेखील बनवला आहे. या संतापजनक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 5 दिवस अत्याचार सहन केल्यानंतर बदनामीच्या भितीने अग्निपरीक्षा दिल्याचा खळबळजनक खुलासा महिलेने केला आहे. या गोष्टीची माहिती कोणाला दिल्यास जिवंत जाळून टाकण्याची धमकी देखील पतीने दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. समोर काहीही पर्याय न उरल्याने महिलेने उकळत्या तेलात हात घालून नाण काढले आहे. तर, बायकोने दिलेली अग्निपरीक्षा जगासमोर आणण्यासाठी हा व्हिडीओ बनवला असल्याचा खुलासा महिलेच्या पतीने केला आहे. या संतापजनक कृत्यानंतर पीडित महिलेला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी पारधी संघनटनेने केली आहे.