तब्बल २० वर्षानंतर बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता पण, कुटूंब गमावलं

आग्रा : वृत्तसंस्था – अलाहाबाद उच्च न्यायालयानं गेल्या २० वर्षांपासून बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. विष्णू तिवारी असं त्याच नाव आहे. २० वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाल्याने विष्णूच्या चेहऱ्यावर हास्य आहे पण तितकंच दुःखही त्याच्या वाटेल आले आहे. कारण या २० वर्षाच्या काळात त्याच अख्ख कुटूंब संपलं आहे. त्याला आई-वडील आणि दोन मोठे भाऊ गमवावे लागले आहे.

आग्र्याच्या तुरुंगाचे वरिष्ठ अधीक्षक व्ही. के. सिंह म्हणाले की, कोणताही अपराध केला नसताना विष्णूला २० वर्षे तुरुंगात काढावी लागली. हि बाब दुर्दैवी आहे. त्याला तुरुंगातून मुक्त करण्यासाठी आम्ही आदेशाची वाट पाहत असल्याचे सिंह यांनी सांगितले.

आयपीसी आणि एससी/एसटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशच्या ललितपूर गावचा रहिवासी असलेल्या विष्णूवर २००० मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं बलात्काराचा आरोप केला. त्यानुसार विष्णूवर अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विष्णू हा वडील आणि दोन भावांसोबत राहायचा. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून तो नोकरीही करत होता.

वडील, भावंडांच्या अंत्यसंस्कारांना मुकला
विष्णूला ट्रायल कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात २००३ मध्ये त्याची रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्याने २००५ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र ते शक्य झाले नाही. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्याला अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. तसेच दोन भावांच्या अंत्यविधींनादेखील त्याला हजर राहता आले नाही.