कार चोरीच्या 20 दिवसांनंतर पोलिसांनी मालकालाच पाठवले ‘ओव्हरस्पीड’चे चलान

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी एका व्यक्तीला त्याची मोटार चोरी झाल्याच्या 20 दिवसांनंतर ‘ओव्हरस्पीड’चे चलान पाठवले आहे. पश्चिम दिल्लीच्या हरी नगरचे रहिवासी योगेश पोद्दार यांची गाडी 6 जून रोजी चोरी झाली. तेव्हापासून त्या कारबाबत काहीही माहिती मिळालेली नाही, पण कार चोरी झाल्याच्या 20 दिवसांनंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना वेगात गाडी चालवून नियमाचे उल्लंघन केल्याबाबत गाडीच्या फोटोसह चलान पाठवले आहे.

योगेश पोद्दार यांची कार 20 दिवसांपूर्वी विवेक विहार पोलिस स्थानकाजवळून चोरी झाली होती. 5 जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोद्दार त्यांची कार विवेक विहार पोलिस स्थानकाजवळ पार्क करुन नातेवाईकांच्या घरी मुक्कामी गेले होते. पण दुसर्‍या दिवशी आल्यावर त्यांची कार तिथे नव्हती. झिलमिल कॉलनीतला रस्ता छोटा असल्याने मुख्य रस्त्यावर पोलिस स्थानकाजवळ गाडी पार्क करुन नातेवाईकांकडे गेलो होतो,

असे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी ऑनलाइन एफआयरही दाखल केली होती. त्यानंतर थेट 30 जून रोजी पोद्दार यांना चक्क गाडीच्या फोटोसह चालान पाठवण्यात आले. जोपर्यंत मला चलान मिळाले नव्हते तोपर्यंत चोरांनी कार दिल्लीच्या बाहेर विकली असेल असाच विचार मी करत होतो. पण आज गाडीच्या फोटोसह चलान आल्यानंतर मला धक्काच बसला.

गाडीचा रंग, रजिस्ट्रेशन नंबर काहीही बदललेले नाही. फक्त डॅशबॉर्डवरच्या काही वस्तू गायब आहेत. तरीही पोलिसांना अजून माझ्या गाडीचा शोध घेता येत नाही, असे पोद्दार म्हणाले. तर, ‘ज्या ठिकाणाहून कार चोरी झाली तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, पण परिसरातील अन्य सीसीटीव्हीच्या आधारे कार चोरांचा तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता पण चोर दिसले नाहीत असे तपास करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like