संतापजनक ! तरुणावर ‘निर्भया’ प्रकरणाप्रमाणे पाशवी बलात्कार, प्रायव्हेट पार्टमध्ये घातले नारळ आणि ‘कंडोम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरातील मुलींवरील बलात्काराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती विविध अहवालांमधून समोर येत आहे अशातच आता तरुणही बलात्काराचे बळी होऊ लागले आहेत. होय, असेच एक ताजे प्रकरण नवी मुंबईतील वाशी परिसरातील आहे. येथे एका २४ वर्षीय तरुणावर पाच जणांनी पाशवी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या तरूणावर सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी गुन्हे करणे येथेच थांबवले नाही, तर त्यांनी युवकाच्या खाजगी भागात नारळ व कंडोम देखील घातला. यानंतर अर्धमेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेल्या तरूणाला काहीजणांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लड़के के साथ निर्भया जैसा गैंगरेप, प्राइवेट पार्ट में डाला नारियल-कंडोम
अशी घडली घटना :
याप्रकरणी वाशी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी वाशीतील जागृतेश्वर तलावाजवळ टाटा कॉलनीतील २४ वर्षीय तरुणांचे अपहरण करून त्याच्यावर अज्ञातस्थळी नेऊन बलात्कार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी आरोपींनी राक्षसीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याच्यावर अत्याचार करताना त्यांनी जननेंद्रियामध्ये नारळ व कंडोम टाकला आणि ते तेथून पळून गेले. वरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडिताला कोपरखेराच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यानंतर, उपचार करत असलेले डॉक्टर प्रशांत शेडगे यांचे म्हणणे आहे की, पीडित युवकाची प्रकृती चिंताजनक असून तो उपचारांना काही अंशी प्रतिसाद देत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाच आरोपी तुर्भे येथील रहिवासी असून त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.