मसाज पार्लरमध्ये फक्त ‘मसाज’ करु इच्छित होता तरुण, मारहाण करुन ‘खिळखिळी’ केली ‘हाडं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबईत एका मसाज पार्लरमध्ये एका व्यक्तीला सेक्स करण्यास नकार देणे महागात पडले. या तरुणाला चार लोकांनी अशी काही मारहाण केली की त्यांची हाड खिळखिळी झाली. तेथील पोलिसांनी या प्रकरणी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

वियतनामध्ये राहणाऱ्या या आरोपींमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी होत्या. दुबईमध्ये ज्या फ्लॅटमध्ये ते राहत होते त्या फ्लॅटमध्ये ते मसाज पार्लरच्या नावाखाली देह विक्री करत होते. एक व्यक्ती मसाज करण्यासाठी त्यांच्या पार्लरमध्ये पोहचले. त्यांने मसाजसाठी 400 दिरहम रक्कम दिली. या व्यक्तीने सांगितले की तो आत गेला आणि त्याचे कपडे काढले. त्याला अंग झाकण्यासाठी टॉवेल देखील दिला नाही. त्यानंतर मसाज करण्यासाठी एक महिला आणि आणि ती सेक्स करण्यासंबंधित बोलू लागली.

पीडित व्यक्तीने सांगितले की, त्याने त्या महिलांना फक्त मसाज हवा असे सांगितले आणि सेक्स करण्यास नकार दिला. त्यानंतर जेव्हा वाद झाल्यावर त्याने आपले 400 दिरहम परत मागितले तेव्हा वाद आणखी वाढला.

या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, तेथे आणखी तीन लोक होते ज्यात आणखी एक तरुणी होती. सर्वांनी मिळून त्याला मारहाण केली आणि स्टील ट्यूबने देखील मारले. या प्रकरणी दुबईच्या अलरफा पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्यात दोन पुरुष ज्याचे वय 18 आणि 39 वर्ष आहे तर दोन महिला ज्याचे वय 33 आणि 35 वर्ष आहे.