प्रियकराने दिलेल्या एका गिफ्टमुळे उलगडलं प्रेयसीच्या आईचं 30 वर्षांपूर्वीचं ‘लफड’, तरुणीला बसला जबरदस्त धक्का !

पोलीसनामा ऑनलाईन – “गिफ्ट” आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गिफ्ट देणे ही फारशी मोठी गोष्ट नाही. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कुठल्याही उत्सवानिमित्त गिफ्ट देतो. मात्र, एका व्यक्तीला गिफ्ट देणे महागात पडले आहे. त्याने आपल्या प्रेयसीला गिफ्ट दिलं होत. आता ही व्यक्ती गिफ्ट द्यायचे की नाही याचा तब्बल हजार वेळा विचार करेल.

अमेरिकेत ख्रिसमसनिमित्त एका युवकाने आपल्या प्रेयसीला एक खास गिफ्ट दिलं. मात्र, या गिफ्टमुळे प्रेयसीच्या कुटुंबातील तब्बल ३० वर्षांपूर्वीचं गुपीत उलगडेल, असा त्याने कधी विचारही केला नसेल. एका युवकाने रेडिट (Reddit) रिलेशनशिप अ‍ॅडव्हाइज फोरमवर आपला किस्सा सांगितला आहे. या व्यक्तीनं सांगितलं , की ‘ख्रिसमसनिमित्त त्याने आपल्या पार्टनरसाठी डीएनए टेस्टिंग किट खरेदी केली होती. मात्र, या किटमुळे त्याच्या गर्लफ्रेंडचे संपूर्ण आयुष्यच बदलले.

प्रियकराने सांगितलं , की या डीएनए किटने त्याच्या प्रेयसीने टेस्ट केली. यानंतर आलेल्या निकालावरून, आपल्या कुटुंबात अणखी एक मुलगी म्हणजेच आपली सावत्र बहिण असल्याचेही त्याच्या प्रेयसीला समजले. ही गोष्ट समजताच तिने थेट आपल्या आईला फोन लावला आणि यासंदर्भात विचारणा केली. मात्र, तिच्या आईने तिला कुठलीही सावत्र बहिण असल्यासंदर्भात नकार दिला.

यानंतर या तरुणीने तिच्या आईला थेट जॉन स्मिथ नावाच्या व्यक्तीसंदर्भात विचारले, तेव्हा तिची आई अवाक झाली. कारण, तरुणीच्या सावत्र बहिणीच्या वडिलांचे नाव जॉन स्मिथ असल्याचं या डीएनए टेस्टमधून समोर आले होते. यानंतर तरुणीच्या आईने अशी कहाणी सांगितली, जी आजवर कुणालाही माहित नव्हती. तरुणीच्या आईनं सांगितलं , की काही दिवसांपूर्वी ती तिचा एक्स बॉयफ्रेंड जॉन स्मिथला भेटण्यासाठी गेली होती. यानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आले, की आपण गर्भवती आहोत आणि आपल्या पोटातील बाळ हे बॉयफ्रेंड जॉन स्मिथचे आहे. या सावत्र मुलीसंदर्भात आपण आजवर कुणालाही काहीही सांगितलेले नाही, असा खुलासाही तिच्या आईने यावेळी केला. आपल्या आईने केलेला हा धक्कादायक खुलासा एकूण मात्र, तरुणीला जबरदस्त धक्का बसला.