प्रेमासाठी काय पण ! पोलीस पत्नीचा गणवेश प्रेयसीला दिला अन् पुढं झालं ‘असं’ काही

इंदूर : वृत्तसंस्था – प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते. मात्र, कधी कधी प्रेमासाठी जेलमध्ये देखील जाण्याची वेळ येऊ शकते. असाच अनुभव इंदुर येथील एका प्रियकराला आला आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी पोलीस पत्नीचा गणेवेश चोरून प्रेयसीला दिला. तिने पोलिसांचा गणवेश घालून अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले आणि पोलीस पत्निचा गणवेश चोरणाऱ्या पतीला तरुंगाची हवा खावी लागली.

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. तसेच तिच्या प्रियकराला देखील पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे प्रियसीला पोलीस अधिकारी म्हणून वावरता यावे यासाठी प्रियकराने आपल्या पत्नीचा गणवेश चोरून प्रियसीला दिला. त्याचा फायदा घेत तिने अनेकांची लुबडणुक केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात किती जणांची फसवणूक झाली आहे याचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला पोलीस असल्याचा बनाव करत होती. पोलिसांचा गणवेश घालून ती लोकांना लुबाडत होती. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेला तोतया पोलीस होण्यासाठी तिच्या प्रियकराने मदत केली होती. त्यासाठी त्याने त्याच्या पोलीस पत्नीचा गणवेश चोरला होता. अटकेत असलेल्या प्रियकराची पत्नी मध्यप्रदेश पोलीस दलात कार्यरत आहे. पोलिसांनी तोतया महिला पोलिसाकडून गणवेश, बनावट ओळखपत्र जप्त केले आहे. पोलिसांनी तोतया पोलीस महिलेचे आणि तिच्या प्रियकराचे नाव गुप्त ठेवले आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या