चक्क मित्राच्या आईशी अफेअर, शेजाऱ्यांकडून प्रेमी युगुलाला बेदम मारहाण

अहमदाबाद : वृत्तसंस्था – प्रेम संबंधांतून प्रेमी युगुलाची मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु हे युगुल अजब आहे. एका तरुणाने आपल्या मित्राच्या आईशी प्रेम संबंध ठेवले त्यातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. मित्राच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरुणाला शेजाऱ्यांनी मारहाण केली. गुजरातमधील कालोल तालुक्यात ही घटना घडली असून विजयजी ठाकोर याने चौघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96061867-d06b-11e8-87c7-6348c0634a76′]
विजयजी संजनाबेनला भेटायला गेला होता. विजयजी ठाकोर याचे मित्र विरामजी ठाकोरची आई संजनाबेन हिच्याशी प्रेमसंबंध आहेत.  त्यावेळी मित्र विरामजी घरी नव्हता. त्यामुळे शेजारी राहणारे जगजी शंकाजी ठाकोर, नेनाजी शंकाजी ठाकोर, अर्जनजी शंकाजी ठाकोर, माथुरजी ठाकोर संजनाबेनच्या घरी गेले आणि मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या घरी येण्याचं कारण विजयजीला विचारु लागले. विजयजीने संजनाबेनसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचं  सांगताच चौघांचा पारा चढला आणि त्यांनी दोघांना काठीने मारहाण केली.
[amazon_link asins=’B07HGBFSC7,B01D2IBM5S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9dddd936-d06b-11e8-aaff-277549f8e461′]
मारहाणीत जखमी झालेले विजयजी ठाकोर आणि संजनाबेन ठाकोर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कालोल तालुका पोलिसात चौघा शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.