खळबळनक ! चाकणमध्ये कचऱ्यात ‘मानवी’ हाताचा तुटलेला ‘पंजा’

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन – चाकण जवळच्या खराबवाडी येथे कचऱ्यातील एका पिशवीत मानवी हाताचा तुटलेला पंजा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकऱणी चाकण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तर कचरा तपासण्यात येत आहे.

याप्रकऱणी घंटागाडी चालक दत्तात्रय मुकुंद गायकवाड (वय ३१, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांचा आपे रिक्षा नगरपरिषदेला कचरा वाहण्यासाठी भाडेतत्वावर देण्यात आला आहे. ते शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास चाकण शहरातील माळ आळी, सिकीलकर हॉस्पीटल, चाकण बाजारपेठ या ठिकाणाहून कचरा गोळा करून बिरदवडी जवळील खराबवाडीच्या कचरा डम्पिंग ग्राऊंडवर गेले. तेथे कचरा डंम्पिंग ग्राऊंडवर खाली केला. त्यावेळी तेथील सुरक्षारक्षक अनिल लेंडघर यांनी गायकवाड यांना सांगितले. की कचरा डम्प करताना गाडीतील कचऱ्याची पिशवी चाळत असताना भंगार गोळा करणाऱ्या महिलेलाल मानवी हाताचा तुटलेला पंजा आढळला आहे. तो सुरकुतलेल्या आणि रक्ताळलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. दरम्यान या प्रकाराने चाकणमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Loading...
You might also like