1400 KM चा प्रवास करून आलेल्या मुलाला आईनं ‘क्वारंटाईन’मध्ये राहण्यास सांगितलं, मुलानं घेतला गळफास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा धोका देशभर कायम आहे. देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 70 हजाराच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोक देशाच्या विविध भागात अडकले आहेत. अशा परिस्थितीत झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील रंकामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेला मुलगा घरी आल्यानंतर आईने त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये रहाण्यास सांगितले तेव्हा त्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

महाराष्ट्रात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला त्याच्या आईने कोरोनाचा धोका ओळखून घरी बोलावून घेतले. आईच्या सांगण्यावरून मुलगा त्रास सहन करत घरी पोहचला. घरी पोहचल्यानंतर, जेव्हा या तरुणाच्या आईने त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास सांगितले तेव्हा त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

1400 किमीचा प्रवास करुन आला होता तरुण
मुकेश कुमार नावाच्या या तरुणाने सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास महाराष्ट्रातील सोलापूर पासून तब्बल 1400 किमीचा प्रवास करून घर गाठले. या तरुणाचे घर रांका येथील हातदोहरा येथे आहे. घरी पोहचल्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्याला असेही सांगितले की, आजूबाजूच्या लोकांनी सांगितले आहे की तुला क्वारंटाईन सेंटरमध्ये रहावे लागेल. मात्र, मुकेशला हे मान्य नव्हते. त्याने यावर काहीही उत्तर दिले नाही.

काही वेळाने मुकेशने आईला विचारले की आज जेवायला काय बनवणार आहे ? यावर आईने सांगितले की बटाट्याची भाजी आणि भात बनवले आहे. त्यानंतर मुकेशने आपल्या बॅगेत ठेवलेला बिस्किटाचा पुडा काढला आणि बिस्कटं खाऊन पाणी पिऊन बॅग घेऊन घराबाहेर निघून गेला.

आपल्या गमजाने घेतील फाशी
मुकेशने राहत्या घरापासून जवळ असलेल्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. मुलगा बराचवेळ झाला आला नसल्याने आईनं त्याचा शोध घेतला. त्यावेळी घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाला मुकेश लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाने फाशी घेतल्याचे पाहून आईने आरडा ओरडा केला. महिलेचा आवाज ऐकून गावकरी तेथे पोहचले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.