FB Live करत ‘डीएमआरसी’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, मित्रानं पोलिसांना कळवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या शाहदरा परिसरातील तरुणाने फेसबुक लाईव्हकरून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती डीएमआरसीचा कर्मचारी होता. अनेक लोकांनी त्यांचा मृत्यू लाइव्ह पाहिला त्यानंतर मृत व्यक्तीच्या सूर्यकांत नावाच्या मित्राने पोलिसांना याबाबत खबर दिली. पोलिस तात्काळ त्या ठिकाणी पोहचले.

सूर्यकांत ने पोलिसांना सांगितले की, शुभांकर चक्रवर्ती हा मूळचा पश्चिम बंगालचा राहणार होता. घटनेच्या वेळी घर आतमधून बंद होते पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शुभांकरचा मृतदेह ताब्यात घेतला. शुभंकरच्या खोलीत त्याचा फोन मिळाला परंतु कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी शुभांकरच्या परिवाराला घटनेची माहिती दिली.

सूर्यकांतला सुसाइड्ची माहिती त्याच्या एका मित्राने दिली होती, त्यावेळी सूर्यकांतने जाऊन पहिले असता त्याला शुभांकरचा मृतदेह दिसला मात्र दरवाजा बंद असल्यामुळे त्याने पोलिसांना बोलावले. शुभांकरच्या परिवारामध्ये एक बहीण आहे आणि वडील आहेत. शुभांकर हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

आरोग्यविषयक वृत्त