धक्कादायक ! प्रेयसीनं 2000 रूपये देण्यास दिला नकार, प्रियकरानं चक्क ‘सॅनिटायझर’ चेहर्‍यावर टाकलं

पोलिसनामा ऑनलाईन – प्रेयसीने दोन हजार रुपये देण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिच्या चेहर्‍यावर सॅनिटाइजर टाकून जाळल्याची घटना चंदिगडमध्ये घडली आहे. पीडित तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

तरुणी मूळची शिलाँगची आहे. नरेश नावाच्या आरोपीने तरुणीकडे दोन हजार रुपये उसने मागितले होते. पण तिने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापातून त्याने तिच्यावर चेहर्‍यावर सॅनिटाइजर फेकले आणि लायटरने तिला पेटवले. नंतर शेजार्‍यांनी पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही तरुणी डिसेंबरमध्ये पहिल्यांदा चंदिगडला आली, त्यानंतर नरेशसोबत तिची मैत्री झाली आणि दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तो सतत तरुणीला पैशांची मागणी करत होता. पैशांवरुन तिला मारहाण करायचा अशी माहिती तरुणीने पोलिसांना दिली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तरुणीने नरेशविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like