एकानं खाल्ली वळूची पावर वाढण्याचं ‘औषध’, डॉक्टरांना करावी लागली ‘सर्जरी’

मेक्सिको : वृत्तसंस्था – मेक्सिकोमध्ये एकाने वळूची लैंगिक क्षमता वाढवणारं औषध खाल्लं, यानंतर त्याची हालत खूपच वाईट झाली. त्याला तीन दिवस रुग्णालयात काढावे लागले. एवढेच नाही तर यामुळे त्याच्यावर सर्जरी करण्याची वेळ आली.

एका रिपोर्टनुसार, मेक्सिकोच्या एका व्यक्तीने आपली लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी वळूला दिलं जाणारं औषध खाल्लं. यानंतर त्याची प्रकृती खूपच खालावली. यानंतर त्याला युएस मेक्सिको सीमेवरील रेनोसा शहरातील स्पेशालिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याची लगेच सर्जरी केली.

एका इंग्रजी वृत्तानुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला रेनोसा शहरातील स्पेशलाईज्ड हॉस्पिटल 270 मध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याने लैंगिक क्षमता वाढवण्याचं औषध खाल्लं होतं. गुरांसाठी वापरले जाणारे उत्तेजक पदार्थ या व्यक्तीने पूर्व मेक्सिकोच्या वेराक्रूजमधून खरेदी केले होते.

फेसबुक पेज लाईक करा –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like