त्याने काढली अशीही नोकरी …

जयपूर: वृत्तसंस्था 
जयपूर मधील एका तरुणाने ६ बेरोजगारांना चक्क एका वेगळ्याच कामाकरिता नोकरीला ठेवले  कदाचित अशा स्वरूपाची नोकरी तुम्ही कधीच ऐकली नसेल. हा तरुण ६ जणांना महिन्याला १५ हजार पगार द्यायचा आणि त्या बदल्यात या तरुणांना दिवसाला १ चोरी करावी  लागायची . आता पोलिसांनी या नोकरी देणाऱ्या म्होरक्याला आणि त्याच्या सहा कर्मचाऱ्यांना देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचं सामान जप्त करण्यात आलं आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dccbadc2-cd55-11e8-8b24-77e8e03db5fe’]

जयपूरमधील एक तरुण बेरोजगारांना चोरी करण्यासाठी चक्क नोकरी देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या व्यक्तीचं नाव आशीष मीणा असं आहे. त्यानं 6 जणांना नोकरीवर ठेवलं होतं. त्या 6 जणांना दिवसाला किमान एक चोरी करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना महिन्याकाठी 15 हजार रुपये इतका पगार दिला जायचा. पोलिसांनी या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून मोबाईल, सोन्याची चेन, मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.

[amazon_link asins=’B07DC5QRHN,B01J22KFRY,B072JBHDTH,B078RJN314′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’029fab6c-cd56-11e8-993e-ff55f0e69e46′]

पोलिसांनी पकडलेली टोळी सर्कल एरिया, शिवदासपुरा, खो नागोरिया, सनागनेर मध्ये खूप सक्रिय होती. या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि चोरी झालेल्या फोनच्या मदतीनं पोलीस या टोळीपर्यंत पोहोचले. ही संपूर्ण टोळी प्रताप नगरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर छापा टाकून पोलिसांनी सातही जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडून 33 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 सोन्याच्या चेन, 4 मोटारसायकल जप्त केल्या. चोरी करणारे 6 तरुण सर्व सामान आशिषकडे जमा करायचे. तो या सर्व वस्तू विकून 6 तरुणांना पगार द्यायचा. या 6 तरुणांना दिवसातून एक चोरी करावीच लागायची. अन्यथा आशिष त्यांचा एक दिवसाचा पगार कापायचा.

अप्पर पोलिस महासंचालक रश्मी शुक्‍ला महत्वाच्या ठिकाणी बदली