धक्कादायक ! ‘या’नं चक्क 240 महिलांना बनवलं होतं ‘सेक्स स्लेव’, प्राण्यांशी देखील बनवले ‘संबंध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्राझीलमधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एथिल एका चर्चमध्ये युथ ग्रुप लीडर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने कमीतकमी 240 महिलांना वेश्या बनवून ठेवले होते. अनेक अनोळखी व्यक्ती आणि जनावरांबरोबर देखील संबंध ठेवण्यासाठी मजबूर केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनी असे या आरोपीचे नाव असून तो सेल्समध्ये काम करत आहे. तसेच चर्चमध्ये देखील व्हॉलिंटिअर म्हणून काम करत आहे. या आरोपीने चार वर्षात 11 राज्यांतील अनेक महिलांचे शोषण केले आहे. आरोपीने सोशल मीडियावर अनेक प्रोफाइल बनवून ठेवले होते. याच्या मदतीनेच तो या महिलांच्या संपर्कात येत असे.

त्यानंतर तो महिलांना इंटिमेट व्हिडीओ आणि फोटोंसाठी पैसे देण्याचे वचन देत असे. मात्र त्यानंतर तो पैसे न पाठवता महिलांना खोट्या पावत्या देत असे. त्यानंतर तो महिलांना ब्लॅकमेल करून आणखी फोटोंची मागणी करत असे. तसेच अनेक महिलांवर त्याने भेटीवेळी बलात्कार देखील केला आहे. तर अनेक महिलांना जनावरांशी संबंध ठेवण्यासाठी मजबूर करत असे.

दरम्यान, अनेक महिलांना त्याने सेक्स कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यासाठी बळजबरी देखील केली आहे. यामध्ये त्यांच्याशी काहीही करण्याची परवानगी मागण्यात येत असे. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

 

Visit : Policenama.com

Loading...
You might also like