धक्‍कादायक ! ‘मालामाल’ होण्यासाठी त्यांनी विवाहीतेला ठेवलं ५० दिवस ‘उपाशी’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चंद्र्पुर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शेगांवमध्ये एका महिलेचा गुप्त धानाच्या मोहापायी अनेक दिवस छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये तिचे लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिचा छळ करण्यात आल्याने वैतागून ती आपल्या घरी निघून आली. त्यानंतर हि धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या सासरच्या लोकांनी तिला ५० दिवस अर्ध उपाशी ठेवले असल्याची माहिती तिने आपल्या घरच्यांना दिली. तिला फक्त जिवंत राहण्यासाठी जितके जेवण आवश्यक आहे तितकेच दिले गेले.

सुनिता (बदललेले नाव ) असे या महिलेचे नाव असून तिच्या सासरचे लोक एका बाबाच्या नादी लागले होते. या बाबाने त्यांना सांगितले होते कि, जर हि महिला उपाशी राहिली तर यांना गुप्तधन मिळणार. त्याचबरोबर त्याने पहाटे पावणेतीन वाजता उठून या महिलेला पूजा करावी लागे. त्यानंतर वैतागलेल्या या महिलेने आपल्या माहेरी येऊन पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध छळ केला असल्याची तक्रार नोंदवली आहे. याविषयी पोलीस अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, तिच्या सासरचे तिच्याकडून एका कासवाची पूजा करून घेत असत. या सर्व गोष्टी तिच्याकडून जबरदस्ती करून घेतल्या जात असत. एक दिवस तिचे वडील  तिला भेटण्यासाठी गेले असता तिचा अवतार पाहून तिला ते घरी घेऊन आले. त्यानंतर तिने तिच्या आईवडिलांना हि सर्व घटना सांगितली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी महिलेचा पती आणि त्याच्या घरच्यांविरुद्ध सेक्शन ४९८ (अ ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर तांत्रिक बाबा  आणि त्याच्यासह घरच्यांविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा कायदा २०१३ नुसार देखील गुन्हा नोंदवला असून याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like