अनैतिक संबंधातून पतीचा खून, पोलिसांची दिशाभूल करणारी पत्नी आणि तिचा प्रियकर ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधाला अडथळा येणाऱ्या पतीचा खून करून अपघात झाल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार ७ जुलै २०१९ रोजी घडला होता. पुनम विठ्ठल बच्चे (वय-३० रा. शिवसाम्राज्य रेसिडेन्सी, खेड) आणि राजेंद्र बाळासाहेब आसाने (वय-२१ रा. आंबेठाण चौक, चाकण), निलेश गोरक्षनाथ अनुसे (रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

विठ्ठल नथु बच्चे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी त्याचा भाऊ बाळु नथु बच्चे (वय-४२ रा. देवोशी, ता. खेड) यांनी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विठ्ठल बच्चे हे आंबेठाण येथील महिंद्रा सी.आय.ई कंपनीत कामाला आहेत. भाम ते रोहकल या रोडवर अज्ञात वाहनाच्या धकडेत त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पहिल्यांदा करण्यात आली. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात हा अपघात नसून खून असल्याचे समोर आले.

महाळुंगे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी राजेंद्र याचा मित्र निलेश आसणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने विठ्ठल बच्चे याचा अपघात झाला नसुन त्याची पत्नी पुनम हिने राजेंद्रच्या मदतीने त्याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पुनमला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिचे आणि राजेंद्र यांचे अनैतिक संबंध होते. यातूनच विठ्ठल बच्चेचा खून केल्याची कबुली तिने दिली. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद  क्षिरसागर, पोलीस उप निरीक्षक व्ही.डी. सपकाळ, सुर्य़वंशी यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त-