धक्कादायक ! मुलीशी ‘प्रेम’ विवाह केल्याच्या रागातून सासरच्यांनी घरी बोलावून जावयाची केली ‘हत्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतरजातीय विवाह केला म्हणून जावयाला घरी बोलावून जावयाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. अहमदाबादमधील वरमोर गावातील एक तरुणीने गांधीधाम मधील तरुण हरेश यशवंत सोलंकी यांच्याशी अंतरजातीय प्रेम विवाह केला होता. त्याचा राग डोक्यात ठेवून जावयाला घरी बोलावून सासरच्यांकडून त्याची हत्या करण्यात आली.

घरी बोलावून हत्या
हे लग्न कुटूंबियांच्या विरोधात जाऊन करण्यात आले होते. परंतू तरुणीच्या घरच्यांकडून मुलीला परत घरी आणण्यात आले आणि अनेक महिने परत सासरी जाऊ दिले नाही. त्यानंतर तरुणाला घरी बोलावून त्याच्यावर धार धार शस्त्रांनी वार करुन त्याची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळतायच पोलीस घटना स्थळी पोहचले आणि प्रकरणाची तपासणी केली.

मुलगी २ महिन्याची गरोदर
हरेश वरमोरच्या उर्मिला झाला हिच्या सोबत एकाच कॉलेजमध्ये शकत होता. दोघांनी ६ महिन्यांपूर्वीच लग्न केले होते. २ महिन्यापूर्वी तरुणीच्या आईने तीला घरी आणले होते. त्यानंतर तरुणाला देखील घरी बोलवून घेतले आणि त्यांची हत्या करण्यात आली. तरुणी २ महिन्यांची गरोदर आहे.

आठ जणांवर गुन्हा दाखल
पोलीसांनी तपासानंतर आठ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि आता पर्यंत २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपी सध्या फरार आहेत, त्यांचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

You might also like