धक्कादायक ! गर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या वडिलांना केला Video कॉल, विचारलं आता काय करायचं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या 20 वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या केली आहे. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्या मुलीच्या वडिलांना व्हिडीओ कॉल करून आता काय करू असे देखील विचारले. त्यामुळे वडिलांनी आपल्या मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले.

30 वर्षीय डेंजिलो क्लार्क याच्यावर 20 वर्षीय किआराच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. त्याने तिच्या हातात चाकू असल्याचे दर्शवण्यासाठी तिच्या वडिलांना फोन केला नंतर तिनेच मागून ओरडून सांगितले कि, चाकू कुणाच्या हातात आहे. 11 सप्टेंबर रोजी एका मुलाची आई असलेल्या किआरा हिची चाकूने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचायच्या आधीच मार्कने त्या ठिकाणाहून पळ काढला होता. त्यानंतर त्याने फेसबुकवर पोस्ट करत लिहिले कि, तिला स्वतःचे आयुष्य संपवायचे होते. मात्र तिला माझी देखील हत्या करायची होती. त्याचदरम्यान हि घटना घडली.

दरम्यान, दोघांची मुलगी एका नातेवाईकाकडे सुरक्षित मिळाली असून पोलिसांनी क्लार्कला अटक केली आहे. त्यानंतर पुढील कारवाई सुरु केली आहे.

Visit : Policenama.com

You might also like