पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा वार करून खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण पूर्व दिल्लीत हत्येची खळबळजनक घटना समोर आली असून या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. येथील जैतपुर परिसरात एका युवकाची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून अवैध संबंधावरून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव विनोद असून आरोपीचे नाव कासीम शेख असे आहे.आरोपी कासीम शेख हा आणि मृत विनोद हे दोघे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र आरोपी कासीम याने विनोद याला आपल्या पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.त्यानंतर रागावलेल्या कासीम याने तात्काळ विनोदवर लोखंडी हत्याराने हल्ला चढवत त्याचा जागीच खून केला. कासीम हा क्लिनींगचे काम करत होता तर विनोद हा सेंटरिंगचे काम करत होता. हे दोघेही वेगवेगळ्या राज्यातील होते. कासीम हा पश्चिम बंगालमधील तर विनोद हा उत्तर प्रदेशमधील रहिवासी होता.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी कासीम शेख याला अटक केली असून पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आरोपी कासीम याच्या पत्नीला देखील ताब्यात घेण्यात आले असून तिच्याकडे देखील चौकशी सुरु आहे.

You might also like