जन्मदात्यानेच केली 3 मुलींची अन् पत्नीची हत्या

कच्छ : पोलीसनामा ऑनलाईन – जन्मदात्या बापानेच पोटच्या तीन चिमुकल्या मुलींची हत्या (Man Kills His Three Minor Daughters And Wife) केली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीला जबरदस्ती विष पाजले आणि घटनास्थळावरून पसार झाला. यात पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखानिया गावात बुधवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाखू संघार उर्फ शिवजी (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. धृप्ती (वय 10), किंजल (वय 7 ) आणि धर्मिष्ठा (वय 2) अशी हत्या झालेल्या मुलींची नावे आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवजी याने आपल्या तीन मुलींची हत्या केली. त्यांची हत्या केल्यानंतर त्याने पत्नी भावना (वय 33) हिला विष पाजले आणि फरार झाला. भावनाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर शेजारचे रहिवासी धावत आले.शेजाऱ्यांनी भावनाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तिचा मृत्यू झाला.

शेजारी त्यांच्या घरी परतल्यानंतर घरात तिन्ही मुलींचे मृतदेह आढळले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. शिवजी याने याने पत्नीला आधी विष पाजले आणि त्यानंतर तिचा गळा आवळला. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने मोठ्या मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच्या दोन लहान मुलींना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शरीरावर जखमाही होत्या. तसेच त्यांचे डोके भिंतीवर आदळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असे जखमांवरून दिसते. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मांडवी पोलिसांनी दिली.

You might also like