नातू पाहिजे म्हणून वाद घालणाऱ्या आईचा मुलाने केला खून

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

सुनेला लागोपाठ दोन मुली झाल्यानंतर आता तिसरा नातू पाहिजे अशी जबरदस्ती करत सुनेवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास विरोध करत वाद घालणाऱ्या आईचा मुलाने निर्घृण खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे घडली आहे. आईचा खून केल्यानंतर या मुलाने आईचा कुणीतरी खून केला असा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी तपास करून हा खून मुलानेच केला असल्याचे उघडकीस आणले. मुलानेच आईचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5eebb5b0-c78a-11e8-9fd7-67c0e3b95a41′]

मंगल शहाजी थिटे (५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा संतोष शहाजी थिटे (३२) यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात आढळून आले असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात मृत मंगल हिचा धाकटा मुलगा दत्तू शहाजी थिटे (२७) याने दिलेल्या फिर्यादीनुसार मृत मंगल ही बचेरी गावात स्वत:च्या थिटे वस्तीवर रात्री घरासमोरील अंगणात झोपली होती. पती शहाजी यांच्यासह दोन्ही मुले, सुना व नातवंडे असे सारे जण झोपी गेले होते.

धक्कादायक… मिरचीची धुरी देऊन मुलीसोबत वडील व इतरांनी केले लैंगिक अत्याचार

अंगणात झोपलेल्या मंगल हिचा रात्री दहा ते बाराच्या दरम्यान कोणी तरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने डोक्यात वार करून निर्घृण खून केलर. तशी नोंद पोलिसांनी घेऊन अज्ञात व्यक्तीला आरोपी केले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा खून मंगल हिचा थोरला मुलगा संतोष याने केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मुलगा संतोष थिटे यास लगेचच अटक करण्यात आली. आईचा खून मुलानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर थिटे कुटुंबीयही हादरून गेले आहे.

[amazon_link asins=’B016D4KCA4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6f5f97b5-c78a-11e8-ae51-0360ffc880f0′]

संतोष याचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला असून त्यास दोन मुली आहेत. लागोपाठ दोन मुलीच झाल्यानंतर स्वत:च्या आर्थिक स्थितीचा विचार करता संतोष याने पत्नीची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कुटुंबनियोजनाची एवढी घाई करू नकोस, तिसऱ्यांदा मुलगाच जन्माला येईल. मला नातवाचे तोंड पाहायचे आहे, असा हट्ट आईने सुनेवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यास विरोध केला होता. समजूत घालूनही आई ऐकत नसल्याचे पाहून संतोष हा चिडला होता. त्यातूनच त्याने आईचा खून केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.