Coronavirus : ‘कोरोना’च्या भीतीनं वडिलांनी केली आत्महत्या, इतरांना सुसाईड नोटमध्ये ‘हे’ सांगितलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. भारतात या विषाणूमुळे होणार्‍या मृत्यूची संख्याही सतत वाढत आहे. त्यामुळे नागरिक सातत्याने चिंतेत आहेत. कोरोनाच्या भीतीने  कर्नाटकमध्ये एका 57 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे  म्हणूनच आत्महत्या करीत असल्याचे  सांगत त्याने सुसाइड नोट लिहली आहे. त्याने कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे.

कर्नाटकातील उडुपी इथला रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने घराबाहेर झाडावर लटकून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि दोन मुले असे त्याचे  कुटुंब आहे. त्याच्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना होम क्वारंटाईनसाठी सांगितले आहे. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या यादीमध्ये मृत व्यक्तीचे नावही नव्हते. तसेच त्याच्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते. तरीदेखील व्यक्तीने आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीला खरेच कोरोना झाला होता का याबाब शवविच्छेनद रिपोर्ट आल्यावर समजेल असे पोलिसांनी म्हटले आहे.